जळगाव : यंदा बदलत्या हवामानामुळे डोखेदुखी वाढली आहे. महाराष्ट्रात मागचे चार दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा एकदा वादळी पाऊस आणि गारपिट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना २८ एप्रिलपर्यंत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामुळे एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळेल पण दुसरीकडे शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज (दि.25) वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात काही जिल्ह्यात वादळी पावसाच्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात हा पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचाच..
आधी होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला, नंतर तरुणाने जे केलं ते धक्कादायकच.. जळगावातील घटना
राज्यात वीज कंपन्याचा झटका! आता ग्राहकांना भरावी लागणार ‘इतक्या’ महिन्यांची सुरक्षा ठेव
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु
सावधान… उन्हाळ्यात कुलर वापरतांना घ्या ही काळजी, अन्यथा….
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बीड, धाराशिव या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे, नगर या भागात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धुळे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.
जळगावला उद्यापासून तीन दिवस अलर्ट जारी
हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला उद्यापासून म्हणजेच २६ एप्रिल ते २८ एप्रिल असे तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याने उकाड्याने जळगावकर हैराण झाला आहे. त्यात पावसाचा अंदाज वर्तविल्याने उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.