Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ; कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!

najarkaid live by najarkaid live
April 24, 2023
in राज्य
0
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ; कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!
ADVERTISEMENT
Spread the love

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 30 जूनपर्यंत शिबिरांचे आयोजन केले आहे. कुटूंबाला सुरक्षित करण्यासाठी आपापल्या ग्रामपंचायतीच्या शिबिराला भेट देवून या योजनांमध्ये सहभाग नोंदवता येईल.

आवश्यक बँक खाते- आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 72 हजार नागरिकांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा लाभ घेतला आहे, तर 8 लाख 16 हजार नागरिकांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या दोन्ही योजनांसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सर्व खासगी बँका व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांपैकी कोणत्याही बँकेत आपले बचत ठेव खाते असल्यास या दोन्ही योजनांचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी ही योजना आहे. यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता 20 रुपये प्रती व्यक्ती प्रती वर्षी इतका अल्प आहे. विमा धारकाचा मृत्यू झाल्यास अथवा दोन्ही डोळ्यांची संपूर्ण अथवा बरी न होणारी हानी झाल्यास किंवा दोन्ही हात अथवा दोन्हीपाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये इतकी भरपाई मिळते. तसेच या योजनेमध्ये एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात व एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये इतकी भरपाई मिळते.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना – नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देणारी ही योजना आहे. यामध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. या योजनेत सहभागी झालेल्या विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपये इतकी भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजने अंतर्गत वार्षिक हप्ता 436 रुपये इतका प्रती व्यक्ती प्रती वर्षी आहे. केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये यादोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होवू शकतात.

नोंदणीसाठीचा कालावधी व वेळ- भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल ते 30 जून 2023 म्हणजेच या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्हा प्रशासन, अग्रणी जिल्हा बँक म्हणजेच आपल्या जिल्ह्यासाठी बँक ऑफ इंडिया, इतर सर्व खासगी बँका, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात येत आहे. शिबिराचे वेळापत्रक संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये हे शिबिर सकाळी 10.30 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहील.

आवश्यक कागदपत्रे- या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी बँक पासबुक व केवायसी कागदपत्रे उदा. पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांसह शिबीराला भेट देवून या दोन्ही योजनांमध्ये आपली नोंदणी करावी. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा असतो. दोन्ही योजनांमध्ये दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असून एकदा नोंदणी झाल्यानंतर दरवर्षी विम्याचा हप्ता ऑटोडेबिट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. काही अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येते. शिबिरामध्ये कागदपत्रांसह पूर्ण अर्जावर व्यवसाय समन्वयक (BC) यांच्या मशीनद्वारे दोन्ही योजनांमध्ये त्वरित ऑनलाईन नोंदणीची देखील सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांबरोबरच बचत गटातील महिलांनी देखील या दोन्ही योजनांमध्ये आपली 100 टक्के नोंदणी करावी आणि कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्याबाबत प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठीचा 456 रुपये वार्षिक हप्ता भरुया.. या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होवूया.. आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित करुया..

०००००

शब्दांकन-वृषाली पाटील,

माहिती अधिकारी,

कोल्हापूर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान… उन्हाळ्यात कुलर वापरतांना घ्या ही काळजी, अन्यथा….

Next Post

राज्यात वीज कंपन्याचा झटका! आता ग्राहकांना भरावी लागणार ‘इतक्या’ महिन्यांची सुरक्षा ठेव

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार

राज्यात वीज कंपन्याचा झटका! आता ग्राहकांना भरावी लागणार 'इतक्या' महिन्यांची सुरक्षा ठेव

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us