पाचोरा । पाचोरामध्ये आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून सभेपूर्वीच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला 25 हजारापेक्षा जास्त लोक जमणार नाहीत. 25 हजाराच्यावर 26 हजारावी खुर्ची आली तर मी राजकारण सोडून देईल, असंही त्यांनी सांगितलं.
तसेच उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला… माझा बाप चोरला. अरे बाबा… बाप चोरला हे माहीत आहे, कुणी चोरला हे माहीत आहे तर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार द्या ना, असंही आ पाटील म्हणले.
उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होणार नाही. माझ्या काकांच्या नावाचा राजकारणत वापर केला जात आहे. ते आजारी असताना विचारपूस केली नाही. आता ते शाखा प्रमुखाची सुद्धा भेट घेत आहेत. माझी ताई आधी उद्धव ठाकरे यांना शिव्या घातल होती. आता ती कडवट शिवसैनिक झाली आहे. माझी ताई हवेत आहे, असंही ते म्हणाले.
हे पण वाचाच..
संजय राऊतांनी आम्हाला चॅलेंज करु नये, नाहीतर आम्ही.. गुलाबराव पाटलांचा मोठा इशारा
महाराष्ट्रात पाऊस, पीकपाणी कसं राहणार? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
कोरोनाबाबत भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे खळबळ, मुलांसाठी ‘हा’ मोठा धोका आहे
उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बाळासाहेबांसारखी जादू नाहीये. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी ताकद असती तर त्यांनी 288 मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. तसेच सर्वच सभांमधून उमेदवार निवडून आणले असते. असे 50 आणि 50 आमदारांवर ते थांबले नसते. त्यामुळे त्यांच्या इतकी काही जादू नाहीये. त्यांची भाषणं तीच तीच आहेत.
उद्धव ठाकरे यांची आजची सभा माझ्याविरोधा नाही. ही सभा माझ्याविरोधात नसून माझे काका, माझ्या राजकीय गुरुच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आहे. माझ्या विरोधातील सभा असेल तर माझी प्रतिक्रिया वेगळी असेल.