मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. या दरवाढीचा परिणाम देशातील काही शहरांमध्ये दिसून येत आहे. आज देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 इंधनाच्या किमती जाहीर केल्या जातात. त्यानुसार आज महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझलच्या किमतीत वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 72 पैशांनी तर डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ झाली आहे. बिहारमध्ये आज पेट्रोल 49 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी महागलं आहे. पंजाबमध्ये कालच्या तुलनेत पेट्रोल (Petrol) 31 पैसे आणि डिझेल 30 पैशांनी महागले आहे.
तर राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेल (Diesel) 47 पैसे आणि डिझेल 43 पैशांनी महागले आहे. हिमाचलमध्ये पेट्रोल 68 पैशांनी तर डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले आहे. हरियाणातही पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी कमी झाले आहे. मध्य प्रदेश आणि पी. बंगालमध्येही इंधन स्वस्त झाले आहे. चेन्नईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीशी कपात झाली आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर
– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर
घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर
तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.
BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.