बीड : वहिनी दिराच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय. विधवा वहिनी आंघोळीसाठी गेलेली असताना दिराने बाथरुमध्ये प्रवेश केला आणि वहिनीशी अश्लील चाळे करत शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडलीय. या प्रकरणी बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीडच्या धारूर तालुक्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. दिरानेच आपल्या विधवा वहिनीचा विनयभंग केला आहे. वहिनी “तू खूप चांगली दिसते, मला आवडतेस” असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित विधवा महिला गावातील शेतवस्तीवर आपल्या 14 वर्षांच्या मुलासोबत राहते. ती आंघोळ करीत असताना तिचा सख्खा दीर बाथरूममध्ये घुसला व तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे करू लागला. यादरम्यान “तू मला खूप आवडतेस, म्हणत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यावर नकार देताच त्याने तिला धमकीही दिली.
हे पण वाचा..
धक्कादायक! मुंबईत कथित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, टीव्ही अभिनेत्रीला अटक
अक्षय्य तृतीयेला या राशीच्या लोकांना धनलाभ होईल, सर्व समस्या दूर होतील
मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय : नेमका काय आहे?
यावेळी दिराच्या तावडीतून महिलेने कशीतरी स्वत:ची सुटका केली आणि आरडओरडा केला. यामुळे शेजारील लोक जमा झाले. लोकांचा आवाज ऐकून आरोपी दिराने तेथून पळ काढला. या संतापजनक घटनेमुळे गावात खळबळ उडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बीडच्या दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.