- स्तुत्य उपक्रम : देशातील पहिलाच पोलीस नाईक करणार स्केटिंगचा विक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – समाजामध्ये पोलिसांबद्दल असा गैरसमज आहे की पोलीस दलात भरती झाल्यावर काही वर्षातच पोलिसांची ढेरी सुटून ते स्थूल होऊन जातात या कल्पनेला छेद देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राष्ट्रीय खेळाडू विनोद पितांबर अहिरे 1 डिसेंबर 2019 रोजी आपल्या आयुष्याची 40 वर्षे पूर्ण करीत असून ते 40 व्या वाढदिवशी 40 किलोमीटर स्केटिंग करून आपला वाढदिवस साजरा करणार आहेत सदर कार्यक्रमाचे आयोजन पॅंथर स्पोर्ट्स असोशियन तर्फे स्केटिंग खेळाडूंनी जळगाव येथील बहिणाबाई गार्डन येथे दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 09:00 वा. आयोजित करण्यात आलेला आहे.
मान्यवरांचे मनोगत झाल्यावर बहिणाबाई गार्डन मधील पाचशे मीटर सिमेंट वॉकिंग ट्रॅक वर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 09:30 वाजता हिरवी झेंडी दाखवून विनोद अहिरे स्केटिंग ला सुरुवात करणार आहेत याअगोदर महामार्गावर सलग स्केटिंग करायचे त्यांचे ठरले होते परंतु महामार्गाचे काम सुरू असल्याने ते शक्य होणार नाही म्हणून बहिणाबाई गार्डन येथील पाचशे मीटर ट्रकचे त्यांना एकूण 80 राऊंड मारावे लागतील
अशा अनोख्या पद्धतीने 40 व्या वर्षी 40 किलोमीटर स्केटिंग करणारे ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर कदाचित भारतातील पहिले पोलिस असू शकता अशी माहिती पॅंथर असोशिएन च्या वतीने दिली आहे. सदर सदर स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव श्री कन्हैयालाल यांनी दिली आहे सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आणि प्रसिद्धी माध्यमांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन पॅंथर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रमोद बराटे यांनी केले आहे.