नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने त्यांच्या घोषणेनुसार, व्हेरिफाईड अकाउंट्समधून फ्री ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गजांच्या ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.
आता फक्त सशुल्क सबस्क्रिप्शन असलेल्यांनाच ब्लू टिकची ओळख मिळेल. ज्यांनी ब्लू टिक प्लॅनसाठी पैसे भरले नाहीत त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक्स काढल्या जात आहेत. 12 एप्रिल रोजी मस्कने व्हेरिफाइड अकाऊंटमधून ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती.
मोफत ब्लू टिक हटाव मोहीम सुरू झाली
ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी सांगितले होते की, 20 एप्रिलपासून व्हेरिफाइड अकाऊंटमधून ब्लू टिक मार्क काढून टाकले जाईल. आता ब्लू टिकसाठी तुम्हाला दरमहा पैसे द्यावे लागतील. घोषणेनुसार, ट्विटरने व्हेरिफाईड अकाऊंट्समधून फ्री ब्लू टिक्स काढून टाकण्याची मोहीम सुरू केली आहे.
हे सुद्धा वाचाच..
LIC ची जबरदस्त योजना! 253 रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळेल 54 लाख, जाणून घ्या कसे?
राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी ; ‘या’ तारखेपर्यंत शाळा बंद राहणार
राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
इतके पैसे ब्लू टिकसाठी द्यावे लागतील
तुम्हाला ट्विटर अकाऊंटवर ब्लू टिक हवी असेल तर तुम्हाला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. ज्यासाठी 8 यूएस डॉलर्स म्हणजेच सुमारे 657 रुपये दरमहा वेबद्वारे भरावे लागतील. त्याच वेळी, iOS आणि Android वर अॅप-मधील पेमेंटद्वारे, तुम्हाला US $ 11 म्हणजेच अंदाजे 903 रुपये दरमहा भरावे लागतील.
ज्या सेलिब्रिटींची ट्विटर अकाऊंट्स त्यांच्या ब्लू टिक्सवरून हटवण्यात आली आहेत त्यांच्या नावांमध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा आणि क्रिकेटर रोहित शर्मा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, इलॉन मस्कच्या ट्विटर टेकओव्हरनंतर, फ्री ब्लू टिक काढून टाकण्याच्या निर्णयासह मोठे बदल दिसून आले आहेत.