जळगाव,(प्रतिनिधी)- शहरात प्रथमच केशराई हॉल आणि पुण्यातील प्रख्यात सुदाम काटे रिसर्च फाउंडेशन व हेल्थझिया हेल्थकेअर कंपनी यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित भव्य दोन दिवसीय आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यावेळी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पदमश्री डॉ. सुदाम काटे, जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, बिएम. फाउंडेशनचे संस्थापक योगेश नन्नावरे, शुभांगीताई बिऱ्हाडे,कार्यक्रमाचे मार्गदर्शक उत्तम अहिरे,केशराई हॉलचे संचालक संदीप अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगाव शहरात प्रथमच सिकल सेल आजारावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक १४ एप्रिल २०२३ दिनांक १३ एप्रिल रोजी पोश्चरल थेरपी उपचार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
विनामूल्य सेवा …
पुण्यातील सुप्रसिद्ध आणि अद्वितीय असलेली *हेल्थझीया हेल्थकेअर* संस्था असून जळगाव मध्ये पहिल्यांदाच मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विनाऔषधी आणि शास्त्रक्रियाविराहित उपचारांनी आपल्या वेदनांपासून रुग्णांना आराम मिळणार असल्याने रुग्णांना या शिबिरातून मार्गदर्शन देखील करण्यात आले.
समाजाचं देणं लागतं – संदीप अहिरे
समाजाचं देणं लागतं…. या भावनेतून वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाल्याने आयोजक संदिप अहिरे यांनी आभार मानले. त्याचबरोबर कार्यक्रमांची संकल्पना आणि उद्देश बाबत त्यांनी आपली भूमिका प्रस्ताविकातून मांडली.
अनमोल सहकार्य…
वैद्यकीय सेवा शिबिराला प्रवीण पाटील सर, डॉ अनिता पाटील, छाया तडवी, नसीम परवीन तडवी. हेल्थझिया कडून डॉ. जयश्री सूरज मोरे, राहुल जैस्वाल आणि टीम आणि SICKEL CELL साथी डॉ. शर्मिला आणि SKR फाउंडेशन टीम यांचे अनमोल सहकार्य मिळाले.