भुसावळ : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण काही केल्या थांबताना दिसत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच 2 हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या खाजगी पंटरासह कोतवाल जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. दोघांना एसीबीचे निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी सापळा रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
भुसावळ तालुक्यातील कुर्हेपानाचे भागातील तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. शेतीची नोंद सातबारा उतार्यावर घेण्यासाठी त्यांनी मंडळाधिकार्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर रवींद्र धांडे याने 12 हजारांची लाच मागितली.
हे पण वाचा..
तरूणीला अमिष देऊन केला वेळोवेळी अत्याचार ; धरणगावातील तरुणाला अटक
सगळ्यात मोठी बातमी! अजित पवारांनी फेसबुकसह ट्विटरवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं
15 दिवसात दोन मोठे राजकीय स्फोट होणार ; सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा नेमका काय?
पेट्रोलियम मंत्र्यांनी केली अशी घोषणा.. पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त??
मात्र लाच द्यावयाची नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी कोतवालाने खाजगी पंटराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी ही कारवाई केली. एसीबीच्या कारवाईनंतर तहसील कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली.