मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच कारण म्हणजे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात अशा बातम्या येत आहेत. अजित पवार यांच्यासोबत 11 ते 12 आमदारही जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही मोठा दावा केला आहे. येत्या दोन आठवड्यात दोन मोठे राजकीय स्फोट होणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुळे म्हणतात की पहिला स्फोट दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात होणार आहे. मात्र, यावेळी त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, अजित पवार यांना कोणत्याही गोष्टीचा राग नाही. विशेष म्हणजे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे काही आमदार ‘दबावाखाली’ पक्ष सोडू शकतात, असे संकेत दिले होते.
हे पण वाचा..
पेट्रोलियम मंत्र्यांनी केली अशी घोषणा.. पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त??
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! धनंजय मुंडे नॉट रिचेबल, चर्चेला उधाण
उन्हाळ्यात दररोज लिंबू पाणी प्या, हे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
दुर्दैवी ; कार्यक्रमानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू ; १५ गंभीर
अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे दादांना विचारा, मला गॉसिपसाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट करणारा नेता म्हणून सर्वांनाच अजित पवार आवडतात, म्हणूनच अशी विधाने केली जातात, असे त्यांनी नमूद केले.