मुंबई : गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. ऐन लगीन सराई आणि साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोनेचे दर प्रचंड वाढले आहे. मात्र आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, सुमारे 900 रुपयांची घसरण नोंदवली आणि 60,348 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाली.
आतापर्यंतच्या उच्चांकावरून किंमत 1000 रुपयांनी कमी झाली आहे. साप्ताहिक आधारावर सोने 182 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोनं (Gold) गेल्या आठवड्यात प्रति औंस $ 2004 च्या पातळीवर बंद झाले. पुढील आठवड्यात अक्षय्य तृतीया असून सोन्याची मोठी खरेदी होणार आहे. किंमतीवर काय कारवाई होणार आहे ते पाहुयात
हे पण वाचा..
आता ‘या’ प्रवाशांसाठी खालची सीट आरक्षित ; लोअर बर्थबाबत रेल्वेने बदलले नियम
लक्झरी बस अन् कारचा भीषण अपघात ; कार चक्काचूर
माध्यमांना बाईट देत असतानाच दोघांना गोळ्या झाडून संपविले ; हत्याकांडाची घटना कॅमेऱ्यात कैद
Bombay High Court Recruitment : 4थी उत्तीर्ण आहात? मग तब्बल 52,000 रुपये वेतन मिळेल
आयआयएफएल सिक्युरिटीजचे कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याने प्रति दहा ग्रॅम 61371 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, प्रॉफिट बुकींगमुळे सुधारणा आली आणि ती रु.60348 च्या पातळीवर बंद झाली.
मूलभूत आधारावर सोन्याबाबत कल सकारात्मक आहे. यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे डॉलरमध्ये घसरण होत आहे, त्यामुळे सोने मजबूत होत आहे. पुढील आठवड्यात अक्षय्य तृतीया आहे, ज्यामध्ये सोने आणि दागिन्यांची प्रचंड विक्री होते. या कारणांमुळे भाव वाढणे अपेक्षित आहे.