बुलढाणा : राज्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. विशेष काल शनिवारी राज्यात खासगी बसचा भीषण अपघातात १३ ते १४ जणांना मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अशात लक्झरी बस आणि कार यांच्यामध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला.
या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून यात तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना बुलढाणा शहरापासून काही अंतरावर येळगाव या गाव नजीक टोल नाक्याच्या पुढे पैनगंगा नदीवरील पुलावर ही घटना घडलीय
नेमकी काय आहे घटना?
संगीतम ही लक्झरी बस बुलढाण्याहून पुण्याच्या दिशने जाण्याकरीता निघाली होती. तर भरधावं कार चिखली कडून बुलढाणाच्या दिशेने येत होती. रात्री 9:30 वाजे दरम्यान बुलढाण्या जवळील पैनगंगा नदीवरील पुलावर संगीतम लक्झरी बस आणि कारची समोर समोर धडक झाली
हा अपघात एवढा भीषण आहे की कार चक्काचूर झाली आहे. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. दरम्यान रुग्णवाहिकेतून तिन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे. मिलिंद पवार असे मृतकाचे नाव असून हे सर्व सव या गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.