जळगाव : शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटाची मालिका सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्याने अतोनात नुकसान केलं आहे. त्यात आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्याचे कारण म्हणजे मागणी वाढूनही व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे केळी बाजारात कृत्रिम मंदी आली आल्याने केळीचे दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील पंधरवडा पासून ते गेल्या महिन्यापर्यंत म्हणजेच मार्च २०२३ पर्यंत केळी भावाला चांगला दर मिळाला होता. त्यादरम्यान, केळीला २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. चैत्र नवरात्रोत्सव व श्रीरामनवमी तथा रमजान पर्वातही केळीचे बाजारभाव स्थिर होते.
परंतु मागणी वाढूनही व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे केळी बाजारात कृत्रिम मंदी आली आहे. त्यामुळे केळीचे भाव तत्काळ प्रभावाने २७०० रुपयांवरून २ हजार ते किमान १ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल इतके गडगडले आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.
हे पण वाचा..
भारतातील असं गाव जिथे महिला कपडे घालत नाहीत, पुरुषांसाठीही आहेत कठोर नियम
ग्राहकांसाठी गुडन्यूज! सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा आजचा जळगावातील दर
गॅसच्या किमतीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, आता मिळणार स्वस्त सिलिंडर!
दरम्यान, इराकचे काही व्यापारी रावेर तालुक्यात खरेदीसाठी आल्याची अफवा पसरली आणि काही शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची वाट पाहत केळीची नियमित कापणी थांबवली. तर दुसरीकडे सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज व्हायरल झाला. वादळ, गारपीट वा पावसाच्या तडाख्यात केळी सापडू नये म्हणून काही शेतकऱ्यांनी केळीवर पालाशयुक्त विद्राव्य खतांचा भडीमार केला. केळी खरेदीदार व्यापाऱ्यांनी केळीच्या मागणीत घट झाल्याचा बागुलबुवा उभा केला आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी केळी भावात कृत्रिम मंदीचे सावट निर्माण केल्याची टीका होत आहे.