नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. दरम्यान, पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून यामुळे खळबळ उडाली आहे.
मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाल्याचं गौफ्यस्फोट वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते असाही गौप्यस्फोट मलिकांनी केली. प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौफ्यस्फोट केला आहे.
हे पण वाचा..
ग्राहकांसाठी गुडन्यूज! सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा आजचा जळगावातील दर
गॅसच्या किमतीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, आता मिळणार स्वस्त सिलिंडर!
शेतकऱ्यांनो पिकाची, जणावरांची काळजी घ्या..! राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा
राज्यातील धक्कादायक घटना! 41 प्रवाशी घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली, अनेक प्रवाशांचा.
पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र, गृह मंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाहीत. ही चूक केली त्यामुळं 40 जवानांना जीव गमवावा लागला असा खुलासा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पुलवामा घटनेनंतर मोदींसोबत बोललो असता त्यांनी गप्प राहण्यास सांगितल्याचं मलिक यांनी सांगितलं. तर अजित डोवाल यांनीही याबाबत मला गप्प राहण्यास सांगत या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल, असे सरकारचे धोरण होते असा मोठा गौप्यस्फोट मलिक यांनी केलाय.