जळगाव : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात रॉकेटसारखी वाढ सुरू आहे. मात्र आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज शनिवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आज उच्चांकीपासून स्वस्तात सोने आणि चांदी खरेदीची संधी आहे.
आजचा सोन्याचा भाव?
जळगावात कालच्या किमतीपेक्षा आज २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७०० रुपयाची घसरण होऊन तो ६०,८०० रुपये (विना जीएसटी) इतका आहे. गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. काही दिवसापूर्वी सोन्याचा भाव विना जीएसटी ६१ हजारांवर गेला होता. मात्र आता तो ६१ हजाराखाली आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आजचा चांदीचा भाव?
जळगावमध्ये आज सकाळी एक किलो चांदीचा भाव ७५,९०० (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर ७७,५०० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात तब्बल १६०० रुपयाची घसरण झाली आहे. मात्र येत्या काही दिवसात चांदीचा दर ८०००० रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे पण वाचा..
गॅसच्या किमतीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, आता मिळणार स्वस्त सिलिंडर!
शेतकऱ्यांनो पिकाची, जणावरांची काळजी घ्या..! राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा
राज्यातील धक्कादायक घटना! 41 प्रवाशी घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली, अनेक प्रवाशांचा..
सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी मिळविण्याची मोठी संधी.. दरमहा 56000 पगार मिळेल, जाणून घ्या पात्रता?
दरम्यान अमेरिकन फेडरल बँकांचे व्याज धोरण आणि बँक तोट्यात गेल्याच्या घटनांतून अनेक गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचा पाहायला मिळत आहे.