मुंबई : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. या घटनेत 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती. बसमध्ये 41 जण प्रवास करत होते अशी माहितीही पोलीस अधीक्षकांना दिली आहे. दरम्यान चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. चालकाचा ताबा सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बसचा तोल गेला. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याने बसमधील प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली. रात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी गाढ झोपेत होते,
Maharashtra| 7 people died & more than 25 injured after a bus fell into a ditch in Raigad's Khopoli area. Rescue operations underway: Raigad SP pic.twitter.com/kneqn5M4A5
— ANI (@ANI) April 15, 2023
मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप, आयआरबी टीमला पाचारण करण्यात आलं आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी बोलवण्यात आलं आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते.