जळगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ठाकरे गट) हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.येत्या २३ एप्रिलला ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
उद्धव ठाकरे हे२३ एप्रिलला सकाळी अकराला विमानाने जळगाव विमानतळावर येतील. नंतर मोटारीने पाचोरा येथे रवाना होतील. पाचोरा येथे माजी आमदार (स्व.) आर.ओ. (तात्या) पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण, मायकोरायझा लॅब चे उद्घाटन नंतर जाहीर सभा घेतील.
या दौरा नियोजनासाठी १५ व १६ एप्रिल रोजी ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगाव व पाचोरा येथे येत आहेत. हा दौरा यशस्वितेसाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आता पासूनच मेहनत घेऊन जास्तीत जास्त सभा मोठी होण्यासाठी कंबर कसली आहे.
हे पण वाचा..
चांगली बातमी! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बँकांना दिले ‘हे’ आदेश
मोठी बातमी! महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार, रमेश बैस यांना कार्यमुक्त केलं जाणार? काय आहे कारण?
या आहेत शेतीशी संबंधित 7 सरकारी योजना! शेतकऱ्यांनो नसेल माहिती तर जाणून घ्या अन् घ्या लाभ??
राज ठाकरेंना मोठा धक्का ; बड्या नेत्याने ठोकला मनसेला रामराम
माजी मुख्यमंत्री ठाकरेंचा असा आहे दौरा…
सकाळी ११- जळगाव विमानतळावर आगमन.
नंतर पाचोऱ्याकडे वाहनाने प्रयाण करतील
१२.३० : पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आगमन
१ ते २ -भोजन
२ ते ३ -विश्रांती
३ ते ४ – राखीव
४.३०- तात्यासाहेब आर.ओ.पाटील प्रयोगशाळेचे उदघाटन
५.१५ – तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे उदघाटन
६.१५- एम.एम.महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा
८.००- जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना