मुंबई : राज्यात भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता राज्यपाल रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त होणार आहेत. तशा हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे कारण?
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यामुळे राज्यात भाजपकडे रमेश बैस यांच्या इतका प्रभावी चेहरा नाहीये. त्यामुळे रमेश बैस यांच्याकडे या निवडणुकीची धुरा देण्यावर भाजपचा भर आहे. रमेश बैस हे छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आलेले आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तसेच लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. याशिवाय पक्षाचा आणि जनतेचाही ते सर्वमान्य चेहरा आहेत.
हे पण वाचा..
या आहेत शेतीशी संबंधित 7 सरकारी योजना! शेतकऱ्यांनो नसेल माहिती तर जाणून घ्या अन् घ्या लाभ??
राज ठाकरेंना मोठा धक्का ; बड्या नेत्याने ठोकला मनसेला रामराम
तुम्हालाही लग्नात 10 रुपयांच्या कोऱ्या नोटाचं बंडल हवेय? ही बँक ग्राहकांना फोन करून देतेय?
त्यामुळे छत्तीसगड जिंकण्यासाठीच रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवकरच महाराष्ट्रातही निवडणुका होऊ घातल्या आहेत.