जळगाव : राज्यातील तापमान पारा आता हळूहळू वाढू लागला आहे. जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. मागील दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला असल्याने जळगाव सर्वात ‘हॉट’ बनले आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढत असलेले तापमान यंदा एप्रीलच्या मध्यापर्यंत अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे कमीच राहिले. दोन तीन दिवसांपुर्वी पर्यंत हवामानात काहीसा गारवा वाटत होता. मात्र मागील दोन दिवसांपासून तापनात अचानक वाढ झाली असून सकाळी दहा वाजल्यापासूनच उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. यामुळे जळगावचा पारा आता ४२ अंशावर पोहचला आहे.
हे पण वाचा..
तोंड दाबून बाजूच्या खोलीत नेलं, अन्.. मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना
जळगाव सुवर्णनगरीत आज सोनं स्वस्त की महाग? त्वरित तपासून घ्या
पोस्टाची ‘ही’ योजना देतेय जबरदस्त फायदा! तुम्हाला बँक FD पेक्षा जास्त व्याजासह मिळणार
मोफत रेशनच्या नियमात बदल; आता ‘या’ दिवशीच मिळणार गहू-तांदूळ!
जळगाव जिल्ह्यातील सर्वच शहरातील तापमान हे चाळीशी पार गेले आहे.ममुराबाद तापमान केंद्रावर ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २६.८ अंश होते, तर तापमान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या ‘वेलनेस’ने जळगावचे तापमान ४२ अंश नोंदले. एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील सर्वच शहरातील तापमान हे चाळीशी पार गेले आहे.