जळगाव : आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याने आयुष्यातील उच्चांक गाठला. तर चांदीच्या दरानेही नवा रेकॉर्ड केला आहे.
जळगावात काय आहे आजचा सोन्याचा भाव
जळगाव सराफ बाजारात आज सोन्याचा भाव स्थिर दिसून आला आहे. आज गुरुवारी सकाळी 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 61,100 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. दरम्यान अक्षय तृतीय सारखा सण काही दिवसावर आला असून यापूर्वी सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठल्याने खरेदी दारांना घाम फुटला आहे.
चांदीचा दर काय?
चांदीच्या किमती बाबत बोलायचे झाले तर गेल्या काही दिवसात चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. आज गुरुवारी चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो इतका आहे. दीड महिन्यापूर्वी चांदी दर 64 हजाराच्या घरात होता. मात्र त्यात आतापर्यंत तब्बल 12000 हजार रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.
हे पण वाचा..
पोस्टाची ‘ही’ योजना देतेय जबरदस्त फायदा! तुम्हाला बँक FD पेक्षा जास्त व्याजासह मिळणार
मोफत रेशनच्या नियमात बदल; आता ‘या’ दिवशीच मिळणार गहू-तांदूळ!
8वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी..मेल मोटर सर्व्हिस, मुंबई मध्ये भरती
अरे बापरे..! 230 दिवसांनंतर देशात आढळली सर्वाधिक कोरोनाची संख्या
दरम्यान, दिवाळीच्या मोसमात सोने 65,000 रुपये आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.