जळगाव : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक दावा करत बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं असून यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा रामजन्म भूमीचे आंदोलन सुरू होतं. तेव्हा सर्व कारसेवक हे प्रभू रामाचं मंदिर बनले पाहिजे; या भूमिकेत होते तिथं पोहोचले होते. यामुळे चंद्रकांत पाटील बाबरी मशिदी संदर्भात यांनी मांडलेली भुमिका ही व्यक्तीगत असेल, परंतु ती पक्षाची भुमिका नसल्याचे बावनकुळे यांनी आज स्पष्ट केले. जळगावात ते माध्यमांशी संवाद साधताना बोलले.
रामजन्म भूमीचं आंदोलन हा एक मोठा विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते; अस म्हणणं चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची ती व्यक्तिगत भूमिका आहे पक्षाची नाही. या विषयात पक्षाची भूमिका ही रामजन्म भूमीच्या आंदोलनात असलेले कार सेवक हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि वेगवेगळ्या (Jalgaon) राज्यांमधून आलेले होते.