जळगाव : राज्यातील अवकाळी अन् गारपीटचे संकट कमी होत नसून मार्च महिन्यातील पंचनामे पूर्ण झाले नसताना राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला देखील आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
13 ते 15 एप्रिल दरम्यान गारपीट होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र विद्रभात कुठेही गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली नाही.
हे पण वाचा..
सरकारचा मोठा आदेश! आता महिलांना घरात एवढेच सोने ठेवता येणार, नाहीतर.. ; जाणून घ्या नियमांबद्दल…
शेतकऱ्यांना दिलासादायक! मार्चची भरपाई लवकरच खात्यात जमा होणार ; कोणत्या जिल्ह्याला किती मदत?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष ‘म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने काढला
जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
आज येथे वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव.
4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्चदरम्यान राज्यात अवकाळीचे नैसर्गिक संकट ओढवले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 177 कोटींच्या मदतीचीही घोषणा केली आहे. एप्रिल सुरू झाला तरी अवकाळी संकट अजून शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही. रविवारी रात्री नाशिक, जळगाव व नगर जिल्ह्यातील काही भागांना गारपिटीचा तडाखा बसला.