जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील नवीन बी. जे. मार्केट समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध या महापुरूषांचा ४० वर्ष जुना पुतळा व मूर्ती काढून विटंबना केल्यासह धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार दिनांक १० रोजी अटक केली दरम्यान दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
प्रशांत शरद देशपांडे आणि अमित एकनाथ पाटील (दोन्ही रा. जळगाव) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा तपास डीएसपी संदीप गावित करीत आहेत.