जळगाव : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी (ता. ११) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रभर संघटनात्मक दौरा करीत असून, त्या अंतर्गत मंगळवारी ते जळगावला येतील.
मंगळवारी वसंत-स्मृति या भाजप कार्यालयाला बावनकुळे भेट देतील. त्यानंतर काही जणांच्या ते खासगी भेटीही घेणार आहेत. तर त्यांच्या उपस्थितीत काही जणांचा पक्षप्रवेशही होणार आहे.
त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, स्मिता वाघ आदी उपस्थित राहतील.