नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असून या योजनांमध्ये विविध श्रेणीतील लोकांना मदत केली जात आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी मोदी सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही घोषणा केली होती. मोदी सरकारने आता खास महिलांसाठी एक योजना सुरू केली आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा केली होती. ही योजना महिला आणि मुलींसाठी एक नवीन अल्प बचत योजना आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली. मोदी सरकारने लाँच केलेले महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाले आहे. या योजनेत सरकारकडून वार्षिक ७.५% व्याजदर उपलब्ध आहे.
हे पण वाचा..
विक्रमी वाढीनंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; ग्राहकांना खरेदीची मोठी संधी..
तुम्हीही सरकारी नोकरी शोधताय? NPCIL मार्फत निघाली मोठी भरती; दरमहा 56000 पगार मिळेल
गर्लफ्रेंडला भेटायला आला अन् तिच्याच मैत्रिणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य
बँकांमध्ये पडून असलेले पैसे तुमच्या नातेवाईकांचे तर नाही ना? आता असे कळणार? सरकारने उचलले पाऊल!
वर्षासाठी योजना
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एप्रिल 2023 ते मार्च 2025 या दोन वर्षांसाठी एक वेळची योजना उपलब्ध आहे. यामध्ये महिला किंवा मुलींच्या नावे दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये निश्चित व्याजदरावर ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र फक्त मुलीच्या किंवा महिलेच्या नावाने बनवता येते. महिला किंवा अल्पवयीन मुलीचे पालक महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना उघडू शकतात.
जमा केलेली रक्कम
दुसरीकडे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांतर्गत, किमान ठेव रक्कम 100 रुपयांच्या पटीत रु. 1000 आहे. खातेदाराच्या एका खात्यात किंवा सर्व महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्यांमध्ये जास्तीत जास्त ठेव रक्कम रु.2 लाखांपेक्षा जास्त नसावी. सध्याचे खाते उघडण्याच्या तारखेपासून किमान तीन महिन्यांच्या अंतरानंतर महिला किंवा मुलीचे पालक दुसरे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडू शकतात.
पैसे काढणे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्याचा परिपक्वता कालावधी दोन वर्षांचा आहे. अशा प्रकारे खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी खातेदाराला मॅच्युरिटी रक्कम दिली जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत आंशिक पैसे काढण्याची सुविधा प्रदान केली जाते. खातेदार खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर खात्यातील शिल्लक रकमेच्या 40% पर्यंत काढू शकतात. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत लहान बचत योजना सामान्यतः कर लाभांसाठी पात्र असतात. मात्र, या योजनेची कर आकारणी अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.