पुणे : तरुणींवर होणारे अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला भेटायला आलेला तरुणाने गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीबरोबरच अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मुंढव्यातील केशवनगरमधील एका सोसायटीत घडला आहे. याबाबत तरुणीच्या तक्रारीवरून मुंढवा पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही तिच्या मैत्रिणीसोबत केशवनगरमधील एका सोसायटीत भाड्याने राहत होती. पीडित तरुणी येरवडा येथील एका कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. मैत्रिणीचा बॉयफ्रेंड अजिंक्य सावंत हा तिला भेटायला मुंबईहून पुण्यातआला होता. 7 एप्रिल रोजी पीडितेच्या मैत्रिणीचा प्रियकर अजिंक्य रमेश रात्री 10.30 वाजता त्यांच्या फ्लॅटवर आला.
पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या प्रियकराची इतरांशी ओळख करून दिली. ते बाल्कनीत बोलत होते आणि अजिंक्य दारू प्राशन करत होता. 8 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता पीडिता झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली.
हे पण वाचा..
बँकांमध्ये पडून असलेले पैसे तुमच्या नातेवाईकांचे तर नाही ना? आता असे कळणार? सरकारने उचलले पाऊल!
भाजपात जाण्यापूर्वी एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये जायचे होते ; संजय राऊतांचा मोठा दावा
कोरोनाने सरकारची चिंता वाढवली..! ‘या’ 3 राज्यात पुन्हा मास्कसक्ती
संतापजनक! तरुणीचा आधी रस्ता आडवून मारहाण केली, नंतर.. पारोळ्यातील धक्कादायक घटना
सकाळी 7.30 वाजता तिला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. ती उठली आणि तिच्या समोर अजिंक्य नग्न अवस्थेत उभा असल्याचे तिला दिसले. फिर्यादीस स्पर्श करुन तिच्या अंगावर पडला. त्याला विरोध करताच मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे. पीडितेने तात्काळ खोली सोडली आणि तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी अजिंक्य सावंत याला अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.