बरेच लोक हेडफोन वापरतात. कुणी ट्रेनमध्ये प्रवास करताना, कुणी ऑफिसला जाताना, काम करताना गाडी चालवतानाही. स्थिती अशी आहे की आता ती लोकांची सवय झाली आहे. पण अनेक वेळा कामाच्या वेळी किंवा फिरताना इअरफोन वापरणे महागात पडते. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील विदिशा रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण फलाटाच्या टोकाला बसलेला दिसत आहे. काही क्षणांमध्ये तिथून अचानक एक ट्रेन येते. ती त्याला धडक देऊन निघून जाते. तरुण फलाटावर पडतो. हा संपूर्ण प्रकार फलाटावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा तरुण भोपाळचा रहिवासी आहे. तो त्याच्या कुटुंबासह विदिशा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर ट्रेनची वाट पाहत होता. कुटुंबीय दूर बसले होते. तर तरुण कानात हेडफोन लावून फलाटाच्या अगदी टोकाला बसला होता.
हेडफोन के नशे ने मौत के मूंह तक पहुंचा दिया था।किस्मत अच्छी थी जो बच गया। हादसा विदिशा स्टेशन पर हुआ है युवक हेडफोन कान में लगाकर गाने सुनता हुआ टहल रहा था,उसी दौरान वहां से गुजरी तेज रफ्तार शताब्दी की आवाज नही सुन पाया और चपेट में आ गया । @brajeshabpnews @ABPNews @PrachandNews pic.twitter.com/zzJsPCyvnd
— Pritesh Agrawal (@pritagr) April 4, 2023
ट्रेनच्या लोको पायलटनं हॉर्न दिला. मात्र कानात हेडफोन लावलेल्या तरुणाला हॉर्न ऐकूच आला नाही. तो तिथेच बसून राहिला. लक्ष दुसरीकडे असल्यानं त्यानं ट्रेन पाहिलीच नाही. ट्रेननं तरुणाला धडक दिली. त्यानंतर तरुण फलाटावरच कोसळला. सुदैवानं त्याचा जीव वाचला. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली. रेल्वे पोलिसांनी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.