मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. येत्या दोन दिवसांत वादळीसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये दिसून येईल. याशिवाय देशातील बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ दिसून येते. IMD च्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवसात कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसने वाढू शकते.
हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात काय सुधारणा होईल?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीचे किमान तापमान १४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा सहा अंशांनी कमी आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) संध्याकाळी 7 वाजता 168 वर मध्यम श्रेणीत होता. हे जाणून घ्या की 0 ते 50 AQI चांगले, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 खराब, 301 ते 400 अत्यंत खराब आणि 401 ते 500 गंभीर मानले जातात.
गारपीट होण्याची शक्यता आहे
विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील भोपाळसह राज्याच्या काही भागात शनिवारी गारपीट झाली आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आयएमडीच्या भोपाळ केंद्राचे संचालक बालसुब्रमण्यम यांनी सांगितले की, आज (रविवारी) मध्य प्रदेशातही असेच हवामान राहू शकते. पश्चिम राजस्थानमधील चक्री वारे आणि केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाच्या रेषेमुळे मध्य प्रदेशात आर्द्रता आहे. जोरदार वारा, गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा..
वारकऱ्यांनो तयारी लागा! ज्ञानेश्वर माऊलींसह संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा
मुलांसाठी ‘हे’ सरकारी खाते उघडा, लग्नाआधी बनणार करोडपती, जाणून घ्या योजनेबद्दल
तुटलेल्या पुलामुळे तरुणाने दुचाकी थेट नदीत उतरवली अन्.. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
महाराष्ट्रात कशी राहणार पावसाची स्थिती?
महाराष्ट्रात 8 ते 10 एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल. अगोदरचं अतिवृष्टी अन अवकाळीच्या कहरातून शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतांना पुन्हा एकदा अवकाळी अन गारपिटीने हाहाकार केला आहे. राज्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ आधार देण्याची गरज आहे.