रावेर : जळगाव जिल्ह्यात सुरु असलेली खुणांची मालिका काही केल्या थांबत नाही. अशातच रावेर तालुक्यात ३२ वर्षीय तरुणाची हत्त्या करून मृतदेह फेकून देण्यात आला आहे. खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप निष्पन्न झालेली नाही.
रावेर तालुक्यातील निमड्या गावातील 32 वर्षीय इसमाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आला आहे. संजय बारेला (32, निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे पण वाचा..
तुच माझे एकमेव प्रेम म्हणत विवाहितेसोबत ठेवले वेळोवेळी शरीरसंबंध, चाळीसगावातील धक्कादायक प्रकार
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना वृद्धांसाठी सर्वोत्तम ; मिळेल असा लाभ, कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिंचनासाठी मोफत वीज मिळेल, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
केंद्र सरकारचा गॅसच्या किमतीबाबत मोठा निर्णय, स्वस्त होणार कि महाग?
खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मयताच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.