जळगाव – घंटागाडी चालकांना तीन महिन्यानंतरही वॉटर ग्रेस कंपनीकडून अद्याप अपेक्षेसारखा मोबदला मिळत नसल्याने घंटागाडी चालकांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मक्तेदाराचे घंटागाडी चालकांनी आपले काम बंद ठेवले होते.
अखेर मनपाचे काही ड्रायव्हर पाठवून घंटागाड्या सुरू झाल्या तेव्हा काम सुरू झाले असल्याचे समजते. मात्र वॉटर ग्रेसच्या अधिकारी यांनी दिलेले आश्वासन पाळतात की नाही याबाबत वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली असल्याचे समजते. घंटागाडी चालकांना किमान वेतननुसार वेतन देणे असे ठरले असतांना अद्यापही त्यांना काही मिळत नव्हते. याबाबत वारंवार मागणी केली जात होती, मात्र अपेक्षेसारखा मोबदला गाळेधारकांना मिळत नव्हता.
वॉटर ग्रेसतर्फे प्रतिनिधी असलेल्या दीपक भंडारी यांनी मंगळवारपर्यंत किमान वेतन देवू असे आश्वासन घंटागाडी चालकांना दिले होते. आता एक दोन दिवसात काय तोडगा निघतो, ठेकेदार पेमेंट व्यवस्थित देतात की नाही याबाबत बुधवारपयर्र्त घंटागाडी चालकांची वेट अॅन्ड वॉचची भूमिका राहील. त्यानंतर काय तो निर्णय घेवू असेही श्री. घेंगट यांनी सांगितले. तसेच अटी व शर्तीत बारीक तपासणी उपायुक्तांकडून झालेली नाही असेही त्यांनी सांगितले. मक्तेदारांच्या दिमतीला स्वच्छतेच्या कामासाठी जवळपास 400 कर्मचारी दिलेले आहेत. या कर्मचार्यांना विशिष्ट गणवेश, साहित्य देणे मक्तेदाराचे काम आहे.काहींकडे तर साहित्यही पुरेसे नसते. अशाही परिस्थितीत हे कर्मचारी मात्र आपले काम बजावत असल्याचे दिसून येते.