पुणे : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याच्या वृत्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अजित पवार यांनी तब्बल १७ तासांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, मला काल कार्यक्रमाला निघत असताना पित्ताचा त्रास व्हायला सुरू झाला. माझं जागरण आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हा त्रास आताचा नाही, आधीपासून होतो. त्रास सुरू झाल्याने औषधे घेऊन घरी शांतपणे झोपलो’.’सकाळी प्रसार माध्यमे पाहून मला वाईट वाटलं की, माध्यमे काहीही दाखवत होते. ते बंद करा. सर्वात आधी पुष्टी केली पाहिजे. कारण नसताना एखाद्याची बदनामी करू नका,अशी विनंती अजित पवार यांनी केली.
हे पण वाचा..
केंद्र सरकारचा गॅसच्या किमतीबाबत मोठा निर्णय, स्वस्त होणार कि महाग?
खबरदार..! आता इंटरनेटवर सरकारविरोधात काहीही लिहाल तर, अन्यथा..
राज्य सरकरचा मोठा निर्णय! आता अनाथ मुलांना शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणार आरक्षण
अधिकारी होण्याची संधी..! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी निघाली मोठी भरती
‘आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने तुम्हाला अधिकार आहे, परंतु आम्ही माणूसचं आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की, हे बरोबर नाही. वृत्तपत्रात देखील अशाच बातम्या होत्या, असेही अजित पवार पुढे म्हणाले.