जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक होणार घातल्या असून यासाठी अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली असून यासाठीचे शासकीय परिपत्रक जाहीर झाले आहे.
जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या काळात होणार असून त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. बोदवड बाजार समितीच्या अंतर्गत मुक्ताईनगर आणि वरणगाव येथील उपबाजार यांचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यातील वरणगाव उपबाजाराला भुसावळ बाजार समितीला जोडण्यात यावे असा प्रस्ताव आधी सादर करण्यात आला होता. राज्याच्या सहकार खात्याने याला मंजुरी दिली आहे. याबाबतचे परिपत्र क देखील जारी करण्यात आले आहे.
हे देखील वाचा..
सरकारचा मोठा निर्णय! CNG-PNG होणार इतक्या टक्क्यांनी स्वस्त
राज्यात स्टॅम्प पेपर खरेदीच्या नियमात बदल, काय आहे नवीन नियम जाणून घ्या?
7वी पाससाठी आज शेवटची संधी.. मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, वेतन 47,600
संतापजनक ! चौथीत शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर दोन शिक्षकांचा लैंगिक अत्याचार
या अनुषंगाने बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या वरणगाव उपबाजाराला भुसावळशी जोडण्यात येत असल्याने येथील निवडणूक तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे या परिपत्रकार नमूद करण्यात आले आहे. बोदवड सोबत राज्यातील खुलताबाद, कुंटुर आणि आष्टी येथील निवडणुका देखील स्थगित करण्यात आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.