अकोला : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असून अशातच अकोला जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
येथे एका नराधमाने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
पीडित अंध महिला आणि तिचा पती अमरावती जिल्ह्यातील परतवाडा राहणारे असून त्यांना पाच वर्षाची मुलगी आहे. तर ती मुलगी लहानपणापासूनच अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (दिग्रस) इथे आजीकडे राहायची.
हे पण वाचा..
अरे बापरे..! एकाच कुटुंबातील तिघांनी उचललं टोकाचं पाऊल, जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
घर-गाडी खरेदी करणाऱ्यांना दिलासा! RBI ने रेपो दराबाबत वर्षभरात पहिल्यांदाच घेतला ‘हा’ निर्णय?
लग्नाआधीच भावी जावई घरी आला, सासू बाहेर जाताच घडलं धक्कादायक
नागरिकांनो काळजी घ्या..! देशात २४ तासांतील धडकी भरवणारी आकडेवारी
दरम्यान, मुलीच्या भेटीसाठी दोघेही ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता परतवाडा बस स्थानकावरून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. अकोल्यात पोहचण्यास त्यांना रात्र झाली. साधारण ८ वाजेच्या सुमारास ते बसमधून खाली उतरले. त्यांना वाडेगाव येथे जाण्यासाठी जुन्या बसस्थानकावर जायचं होतं. मात्र, रात्रीची वेळ असल्यामुळे आणि त्यातच पाऊस सुरू असल्याने त्यांना तिथे जाणे शक्य नव्हतं.त्यामुळे रेल्वे स्थानकावरच रात्रीचा मुक्काम करायचं दोघांचं ठरलं. त्यावेळी पत्ता विचारण्यासाठी मदतीचा हात मागणाऱ्या एका व्यक्तीनेच दोघांनाही अकोट फ़ैल परिसरात नेलं. या नराधमाने पती आणि पत्नी दोघेही अंध असल्याचा फायदा घेत महिलेवर अत्याचार केला.
याबाबत पोलिसांनी गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) या संशयित नराधमाला अटक केली आहे.