मुंबई : गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली असून सोन्याने पुन्हा एकदा जुना विक्रम मोडून नवा विक्रम केला आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आज हनुमान जयंतीच्या दिवशी सोने-चांदी दराने उच्चांक गाठला आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
काल बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ०६६ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचा भाव प्रतितोळा ६० हजार ८८१ इतका झाला होता. गुरूवारी सुद्धा सोन्याच्या भावात तेजी आली. सराफा बाजार उघताच सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ६१ हजार ३३१ इतका झाला आहे.
आजचा चांदीचा भाव काय?
दुसरीकडे सोन्याबरोबर चांदीच्या (Silver Price) दरातही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सराफा बाजारात चांदीचा भाव २ हजार १३४ रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे १ किलो चांदीचा दर ७६ हजार ८३४ वर पोहचला होता. गुरूवारी चांदीच्या दरात घसरण होईल, असं अनेकांना वाटत होतं. मात्र, सराफा बाजार उघताच चांदीचे दरही झपाट्याने वर गेले. आज सराफा बाजारात १ किलो चांदीचा दर ७७ हजार ९० इतका आहे.