स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1022 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज 1 एप्रिलपासून सुरू झाले आहेत आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 आहे. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
एकूण – 1022 पदे
ही पदे भरली जाणार?
जाहिरातीनुसार, चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी ही भरती होणार आहे.
कोण अर्ज करू शकतो?
या पदांसाठी फक्त SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात. अधिक आणि तपशीलवार माहितीसाठी कृपया sbi.co.in या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
निवड प्रक्रिया ?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीवर आधारित असेल. यासाठी प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून निवड केली जाईल. या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 100 गुणांच्या मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
पदांची संख्या?
या भरतीद्वारे एकूण 1022 पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर ही पदे भरण्यात येणार आहेत.
वयाची अट : तीनही पदांसाठी किमान वयोमर्यादा ६० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ६३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज कसा करायचा?
1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
2. आता अर्ज करा किंवा उमेदवार करिअर विभागात जा.
3. तुम्ही येथे दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड करू शकता.
4. आता ऑनलाइन अर्ज पृष्ठावर जा.
5. तुमच्या अर्जातील तुमची संपूर्ण माहिती येथे सबमिट करा.
6. अर्ज करताना उमेदवारांना विहित शुल्क जमा करावे लागेल.
7. अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवावी.