मुंबई – विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये ठाकरे घराण्यातील पहिल्यांदाच निवडणूक लढवून वरळीतून निवडणून आलेले आदित्य ठाकरे यांनीही आज शपथ घेतली. आदित्य यांचे वरळीत अनेक फलक झळकले होते, यामध्ये हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडविण्याची अशा आशयाचेदेखील काही फलक होते.
आदित्य यांनी केलेल्या घोषणेचा पुनरुच्चार करत आदित्य माध्यमांशी बोलताना म्हणाले की, येणाऱ्या काळात नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे सांगितले. दरम्यान, विधीमंडळामध्ये आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. विधानसभेत सर्वाधिक आमदार असून त्यामध्ये आदित्य ठाकरे देखील शामिल आहेत. यावेळी शपथविधीनंतर या शपथविधीनंतर आमदार आदित्य ठाकरे बाहेर पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. येणाऱ्या काळात युवा आणि नव्या दमाच्या सरकारमध्ये काम करताना आनंद होत आहे. तसेच येत्या काळात नव्या महाराष्ट्र घडविणार असल्याचे आदित्य याप्रसंगी म्हणाले.