मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल महिनाभरानंतर काँग्रेसनं आपल्या विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीच या पदावर निवड झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्या नावाची घोषणा केली.
जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यात गटनेते पदासाठी थोरात यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला एकमतानं मंजुरी देण्यात आली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हेही यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करून सर्वांनी त्यास मान्यता देऊन ठराव मंजूर केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अ. भा. काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते व सर्व आमदारांचे आभार मानतो असे निवडीनंतर आ. थोरातांनी सांगितले. आ. बाळासाहेब थोरात नगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिीत्व करीत आहेत. सलग आठवेळा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. सर्वात ज्येष्ठ सदस्याचा मानही त्यांनाच मिळाला आहे.