जळगाव :महिलांसह अल्पवयीन होणारे अत्याचार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच जळगाव जिल्हयातील रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. तिने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाळाला जन्म दिला आहे.
नेमकी काय आहे घटना?
आपले लग्न होणार नाही भीतीने मुक्ताईनगरमधील प्रेमी युगलाने उचललं टोकाचं पाऊल
पहूर – शेंदुर्णी दरम्यान विदयार्थ्यांना घेऊन जातं असलेली स्कूल बस उलटली
जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण
रावेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडिल ऊस तोडणीचे काम करून उदरनिर्वाह करतात. साधारण सात महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह बारामती तालुक्यातील फलटणजवळ ऊस तोडणीला गेली.
तिथे झोपडी करून वास्तव्याला होते. पीडित मुलगी झोपडीत एकटी असताना, आरज्या (पूर्ण नाव माहिती नाही) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. मुलीने घरात घाबरून कुणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर कुटुंब पुन्हा मुळ गावी परत आले. त्यानंतर पीडितेला त्रास जाणवू लागल्याने तिला रुग्णालयात आणण्यात आले.
हे पण वाचा..
तपासणीअंती पीडिता गर्भवती राहिल्याचे समोर आले. तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे पीडित मुलीने मुलाला जन्म दिला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.