जळगाव : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून त्यातच मागील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. दर कधी कमी होणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जळगावातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढउतार होत असतात.
आज रामनवमीच्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा 100 रुपयांनी वाढ झाली आहे. आज त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 600 रुपयापर्यंत गेला आहे.
गेल्या काही काळत सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीही 70 हजारांच्या घरात टिकून आहे. चांदीचा आजचा दर 70 हजार 500 रुपये प्रति किलोवर गेला आहे.
हे पण वाचाच..
अखेर आली गुडन्यूज ; सरकारने पेन्शनमध्ये केली ‘एवढ्या’ रुपयांची वाढ
सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांनो लागा तयारीला ; केंद्रात तब्बल ‘इतके’ लाख पदे रिक्त
तुमची अनेक कामे विवाह प्रमाणपत्राशिवाय होणार नाहीत, अशा प्रकारे करता येईल विवाह नोंदणी?
भारतीय लोक सोने चांदीसारख्या मौल्यवान गोष्टींचे चाहते आहेत. त्यामुळे सण, उत्सव, समारंभ अशा मंगल प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर रोजच्या रोज बदलत असतात.