जळगाव,(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या पाळधी येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन गटांत झालेल्या तुफान दगडफेकीच्या घटनेनंतर गावात ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दोन्ही गटांतील शंभराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ५८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर गावात तणावपूर्ण शांतता असून, कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी भादंवि १४३, १४७, १४८, १४९३२४४२७, ३०७, ३५३, ३३२. सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम ३,३७ (१) (३)चे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका धार्मिक स्थळाजवळून काही लोक जात असताना त्यांच्यावर अचानक दगडफेक झाली होती. त्यातून मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस प्रशासनाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता निर्माण केली.बुधवारी सकाळी पोलिसांनी तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे केले. बुधवारी गावातील सर्व शाळा, दुकाने बंद ठेवली होती. तर शाळेतील मंगळवारी रात्री पाळधी गावातील परीक्षाही स्थगित करण्यात आल्या.