जळगाव : गेल्या दोन महिन्यापासून 11025 आणि 11026 क्रमांकाची भुसावळ -पुणे हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्याने खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, येत्या 1 एप्रिलपासून ही गाडी पुन्हा सुरु होणार आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमोल्डिंगचे काम २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान हाती घेण्यात आले होते. यासाठी भुसावळ- पुणे हुतात्मा एक्सप्रेस तब्बल दोन महिन्यापासून बंद होती. ही गाडी आता पुन्हा एक एप्रिलपासून सुरु होणार आहे.
हे पण वाचा..
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज
अॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षासाठी निलंबित ; नेमकं काय आहे प्रकरण?
कोयता गँग धुमाकूळ : केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर हल्ला, धडकी भरवणारा Video व्हायरल
पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही भुसावळसह जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकांवरून कल्याणमार्गे पुणे येथे जाण्यासाठी अतिशय महत्वाची गाडी आहे. या ट्रेनमुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची सुविधा होत असते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून ही गाडी बंद असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.