जळगाव : प्रत्येक तरुणाला वाटत असते कि आपल्यालाही सरकारी नोकरी लागावी. मात्र नोकरी मिळणे आजकाल सोपे नाहीय. त्यातही काही पालक मुलांच्या सरकारी नोकरीसाठी वशिला लावण्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत. मात्र, याचाच फायदा घेत भामटे घेत आहेत. असाच धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला.
मंत्रालयात तसेच रेल्वेत मोठ्या जागेवर सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील एका कुटुंबाची तब्बल २२ लाखांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यादरम्यान संबंधितांनी नोकरीच्या ऑर्डरही दिल्या, मात्र त्या बनावट असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक असे की, शिव कॉलनीतील रहिवासी प्रवीणचंद्र दिघोळे (वय ५८, रा. शिव कॉलनी, जळगाव) यांना चंद्रभान ओसवाल व त्याचा भाऊ अनिल ओसवाल (दोघे रा. धुळे) यांनी तुमच्या मुलाला मंत्रालयात नोकरी लावून देतो, असे २०१८ मध्ये सांगितले होते. १० मे २०१८ रोजी दोघे दिघोळे यांच्या घरी येत मंत्रालयात आमचे अधिकारी परिचयाचे असून, त्यासाठी २२ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. दिघोळे यांनी दोघांना नऊ लाख रुपये रोख दिले. २७ मे रोजी पुन्हा घरी बोलावून सात लाख रुपये दिले. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा बनावट नियुक्तीपत्र घेवून दिघोळेंकडे येत तुमच्या मुलाचे काम झाले असून, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी कामावर रुजू केले जाणार असल्याचे त्याने सांगितले.
हे पण वाचा..
देशात कोरोनाची नवी लाट येणार? 24 तासात आढळले तब्बल ‘एवढे’ रुग्ण
कोयता गँग धुमाकूळ : केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर हल्ला, धडकी भरवणारा Video व्हायरल
ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार
मात्र, दिघोळे मुंबईत गेले. मात्र, त्यांना कुणीही भेटले नाही. शेवटी त्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. त्यानंतर दिघोळेंना ओसवाल याने तुम्हाला दुसरी नोकरी देतो, असे सांगत त्यानेच ओळख करून दिलेल्या हरताली प्रसाद रोहिदास याने दिघोळेंना मुलाला रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदाचे नियुक्तीपत्र देतो, असे आमिष दाखवून सहा लाख रुपये मागितले. दिघोळेंनी हरतालीच्या बँक खात्यावर ८ ते ११ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सहा लाख रुपये पाठविताच दिघोळेंच्या व्हॉट्सअॅपवर नियुक्तीपत्र पाठविले. मात्र, त्यांना कुठलीही नोकरी लावून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याने दिघोळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रभान ओसवाल, अनिल ओसवाल, हरताली प्रसाद रोहिदास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.