दिवसेंदिवस गुन्हेगार फसवणूक करण्याची वेगवेगळी शक्कल लढवून अनेकांना चुना लावत आहेत, अनेक प्रकरण आपण पाहतो की ऑनलाईनच्या माध्यमातून फसवल्या जातं आहे…. आता नवा ट्रेंड सुरु आहे तरुणीचे बनावट प्रोफाइल तयार करून मैत्री, रोमान्स किंवा सेक्स चॅट ची ऑफर देऊन आर्थिक फसवणूक केली जातं असल्याचे समोर येतं आहे.
जर तुम्हालाही ऑनलाइन मैत्री, रोमान्स किंवा सेक्स चॅटची आवड असेल, तर ही ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे.एका प्रकरणात भरतपूर पोलिसांनी वडील आणि मुलाला ताब्यात घेतले आहे.या पिता पुत्रांनी ऑनलाइन सेक्स चॅटच्या माध्यमातून तरुणीचे बनावट प्रोफाइल तयार करून व्यावसायिकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्यावर आरोप आहे दरम्यान भरतपूर पोलिसांनी या पिता-पुत्राला अटक केली.
#सावधान….
अगर आप भी ऑनलाइन दोस्ती, रोमांस या सेक्स चैट के शौकीन हैं, तो ऑनलाइन सेक्स चैट वाली इस जोड़ी को देखकर हो जाए सावधान।भरतपुर पुलिस ने लड़की की फर्जी प्रोफाइल बना ऑनलाइन सेक्स चैट के जरिए एक व्यापारी से 14 लाख की ठगी के आरोप में बाप-बेटे की इस जोड़ी को किया गिरफ़्तार। pic.twitter.com/LuoyqIiNFp
— NCIB Headquarters (@NCIBHQ) March 27, 2023
केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर क्राइम किंवा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (155260) जारी केला आहे. या क्रमांकावर तुम्ही फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता. तुम्ही कोणत्याही अशा प्रकारच्या गुन्ह्याचे बळी असाल तर सर्वप्रथम या क्रमांकावर कॉल करा