जळगाव: जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे. घरफोडी, जबरचोरीसह दरोड्यांच्या घटना वाढताना दिसून येते आहे. अशातच एक थरार घटना समोर आलीय. अमळनेर शहरातील एका पेट्रोलपंपावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांकडून सुमारे ३६ हजार ५०० रूपयांची लुट करून दरोडेखोर पसार झाले. हा प्रकार पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो ‘मटा’ने प्रसारित केला आहे दरम्यान, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरूवारी २३ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती हातात बंदूक घेवून आला. यावेळी पेट्रोल पंपावर किशोर रविंद्र पाटील आणि नरेंद्र सोनसिंग पवार हे कार्यरत होते. दरोडेखोरांनी त्यांच्याकडून बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. सुमारे ३६ हजार ५०० रूपयांची लुट केली. ही थरारक घटना पंपावरील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
VIDEO: जळगावात बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांना लुटले pic.twitter.com/zYUmB6unzq
— Maharashtra Times (@mataonline) March 25, 2023
तसेच पेट्रोल पंपावर एक कार चालक पेट्रोल भरण्यासाठी आला असता त्याला देखील बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे देखील काढून घेतले. हा प्रकार पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले असून संशयितांची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.