चाळीसगाव,(प्रतिनिधी)- शहरातील एच.एच. पटेल या तंबाकूच्या कंपनीतील कंपाऊंडची भिंत कोसळल्याने या दुर्घटनेत ३ मजूर ठार झाल्याची घटना दिनांक १९ मार्चच्या रात्री घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, चाळीसगाव येथे एच.एच. पटेल ही तंबाकू निर्मित करणारी कंपनी आहे. या कंपनीत रविवारी दि.१९ रोजी रात्री कंपनीतील नाली सफाईचे काम ब्रेकर मशिनने काम सुरू असतांना अचानक कंपाऊंडची भिंत कोसळून मजूर दबले गेले. यात मोहंमद अकील साकीर आली, विनीत कुमार जमुनाप्रसाद चौरसिया आणि लतीफ रहीम बक्स हे तीन मजूर मृत्यूमुखी पडले तर एक मजूर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्री उशीरा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. मयत तिनही मजूर हे उत्तर प्रदेशातील होते.