व्हाट्सअप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांना नेहमीच नवीन नवीन फिचर देऊन सेवा देत असतात. नुकतेच WhatsApp ने iOS युजर्ससाठी नवीन फीचर जारी केले आहे. कंपनीने App ची नवीन आवृत्ती जारी केली आहे, ज्यामध्ये व्हाट्सअप वापरकर्त्याला एक छान फिचर दिले आहे.
या फीचरच्या मदतीने, iOS युजर्स फोटोवर लिहिलेला मजकूर थेट टेक्स कॉपी करू शकतात. जरी हे फीचर आयओएसमध्ये यापूर्वी देखील उपलब्ध होते, मात्र व्हाट्सअपने ते आपल्या प्लॅटफॉर्मवर आता जोडले आहे. व्हाट्सअँप वरूनच टेक्स्ट कॉपी करता येणार आहे. नवीन अपडेट बीटा व्हर्जनचा भाग नाही. त्याऐवजी, कंपनीने ते स्टेबल युजर्ससाठी जारी केले आहे. या फीचरचा तपशील WABetaInfo ने शेअर केला आहे.
जर तुम्ही iOS युजर्स असाल आणि हे फीचर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला App Store वर जाऊन WhatsApp अपडेट करावे लागेल. यानंतर तुम्हाला नवीन फीचर दिसेल. इतर अनेक नवीन फीचर्स WhatsApp वर येणार आहेत. असेच एक फीचर म्हणजे ऑडिओ स्टेटस. या फीचरच्या मदतीने तुम्ही WhatsApp स्टेटसवर व्हॉइस नोट्स शेअर करू शकाल. कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर हे फीचर जोडले आहे.