जळगाव : जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ युनायटेड स्टेटच्या वतीने ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता पाहता त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचे पाहायला मिळतेय. जळगावच्या सुवर्ण नगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीही वाधरली आहे.
आज सोन्याचा दर जवळपास ५७९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकले जात आहे. यापूर्वी काल सोन्याचा दर ५७,२०० रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच त्यात ७०० रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.तर दुसरीकडे चांदी ६६८०० रुपये प्रति किलो इतकी आहे. ६४,२०० रुपये प्रति किलो इतका होता. आज मंगळवारी सकाळी चांदीचा दर ६६,८०० रुपये प्रति किलो इतका आहे. म्हणजेच २४ तासात चांदी तब्बल २६०० रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.
पाडव्यापर्यंत तेजीचे संकेत
मार्च आणि एप्रिल महिन्यात माेठ्या लग्नतिथी आहेत. या अनुषंगाने दागिने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात गुढीपाडवा आहे. या दिवशीही साेने खरेदी माेठ्या प्रमाणात केली जाते. या पार्श्वभूमीवर पाडव्याला साेने तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चांदीच्या दरात मात्र संथगतीने चढ-उतार सुरू असल्याचे दिसते आहे.
तर साेने ६० हजारांवर
साेन्याच्या दरात गेल्या आठवड्यात आलेली तेजी आगामी दाेन दिवस कायम राहत दर वाढले तर पुढील आठवड्यात साेन्याचे प्रती ताेळ्याचे दर ६० हजारांचा टप्पा पार करू शकेल. सध्या तरी तसे चित्र दिसते आहे, असा अंदाज साेन्याच्या दराचे अभ्यासकांनी वर्तविला आहे