मुंबई : आज जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहे. कारण आज सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. सोबतच चांदीचाही दर वधारला आहे. जाणून घेऊयात काय आहे १० ग्रॅमचा भाव..
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 56748 रुपयांच्या पातळीवर उघडला आहे. तर मागील व्यवहाराच्या दिवशी तो 55669 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा भाव 1079 रुपयांच्या वाढीसह उघडला.
आज सोन्याचा दर 1079 रुपयांनी तर चांदीचा दर 1639 रुपयांनी वाढला
तर आज चांदीचा दर 63430 रुपये प्रतिकिलोवर खुला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 61791 प्रति किलो दराने बंद झाला होता. त्यामुळे आज चांदीचा दर 1639 रुपये प्रति किलोच्या वेगाने उघडला आहे.
एमसीएक्सवर सोने तेजीसह व्यवहार करत आहे. 5 एप्रिल रोजी सोन्याचा फ्युचर्स ट्रेड 313.00 रुपयांनी वाढून 56,463.00 रुपयांवर आहे. दुसरीकडे चांदीचा वायदा व्यवहार 616.00 रुपयांच्या वाढीसह 63,506.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
सोने सध्या 2134 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
हे पण वाचा..
लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर केला दोन वर्ष अत्याचार ; गर्भवती राहिल्यानंतर… जळगावातील धक्कादायक घटना
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ‘एवढे’ सानुग्रह अनुदान
भररस्त्यात नगरसेवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी
दरम्यान, जळगाव सराफ बाजारात देखील सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 57500 रुपयापर्यंत गेला आहे. सोबतच चांदी 64500रुपये प्रति किलो पर्यंत गेली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची झपाट्याने खरेदी-विक्री होत आहे. यूएसमध्ये सोने 1.17 डॉलरच्या वाढीसह 1,877.41 डॉलर प्रति औंस या दराने व्यवहार करत आहे. चांदी 0.10 डॉलरने घसरून 20.75 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.