पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी माहिती दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेणार. सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. तसेच शेतकऱ्यांना वर्षाला हेक्टरी ७५ हजार रुपये देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘पाणी फाउंडेशनची गट शेती व्यवस्था पाहून गट शेती करण्यासाठी काहीतरी नवी योजना तयार करणे गरजेचे वाटते. शेतकरी दिवसा वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी आता करताना दिसत आहे’.’आता शेतकऱ्यांना दिवसाला बारा तास वीज पुरवठा करण्यासाठी वीज पुरवठा करणारे फिडर सोलरवर करण्याचं काम आपण हाती घेतं आहोत. शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ३० % फिडर आपण आता सोलारवर केले आहेत, असे ते म्हणाले.फडणवीस यांनी पाणी पाउंडेशनच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
हे पण वाचा…
मुक्ताईनगरातून मोठी बातमी..! गुटख्याने भरलेला ट्रक पुन्हा पकडल्याने खळबळ
अखेर पोटातलं ओठावर आलं? गुलाबरावांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच जाण्यामागचे कारण..
क्या बात है..! 10वी, ITI पास उमेदवारांसाठी 5395 पदांची मेगाभरती, असा करा अर्ज??
‘सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती ३० वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. नापीक असलेल्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सौरउर्जा प्रकल्पासाठी करार पद्धतीने भाड्याने घ्यायला तयार आहोत. त्याला वर्षाला ७५ हजार रुपये देणार, त्यावर दर दोन वर्षांला दोन टक्के दर वाढ देणार, असेही त्यांनी सांगितले.