जळगाव : गेल्या ९ महिण्यापुर्वी राज्यात राजकीय भूकंप घडून आला आहोत. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र या बंडखोरीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नव्हते. त्यामुळे सर्वजण गेले तरी गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील अशी चर्चा होती. परंतु गावाला जातो म्हणून सांगून गुलाबराव पाटील थेट गुवाहाटीत पोहोचले. त्यामुळे गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत का गेले? त्यामागचं कारण काय याची चर्चा चांगलीच रंगली होती. अखेर गुलाबराव पाटील यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेलो? हे स्पष्ट केलं आहे.
आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सांगितलं. मात्र तुम्हाला जायचं असेल तर जा असे संजय राऊत यांनी म्हटलं. त्यामुळे मीही मंत्रिपदाचा विचार केला नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचं उद्धाटन आणि भूमीपूजन सोहळ्याचं आयेाजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला होता कदाचित हा सत्तेचा प्रयोग फसला असता तर? मात्र तरीदेखील मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी सांगितलं.